विवाहबाह्य संबंधातून विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

पारनेर :- तालुक्यातील कोहकडी येथे विवाहितेची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली. शुक्रवार संध्याकाळी सातच्या सुमारास ही घटना घडली.

संध्या सुभाष गव्हाणे (२२) असे या तिचे नाव असून विवाहबाह्य संबंधातून ही हत्या झाल्याचा संशय आहे.

गव्हाणे कुटुंबीय भटक्या समाजातील असून गेल्या काही वर्षांपासून ते कोहकडी येथे मोलमजुरीसाठी स्थायिक झाले आहेत.

मृत संध्याचे चार वर्षांपासून शेजारी राहणाऱ्या तरुणाशी अनैतिक संबंध होते. त्यावरुन संध्या व पती सुभाष यांच्यात वाद होत.

संध्याकाळी संध्या घराजवळ रक्ताने माखलेल्या अवस्थेत पडलेली दिसली. शेजाऱ्यांनी तिला उपचारांसाठी शिरूर येथे हलवले. मात्र, रस्त्यातच ती मरण पावली.

घटना घडली त्यावेळी अनैतिक संबंध असणारा तरूण संध्याच्या घराजवळून जाताना स्थानिकांनी पाहिला. पोलिसांचा त्याच्यावरील संशय बळावला आहे.

घटना घडली तेव्हा संध्या घरी एकटी होती. तिचा पती ऊसलागवडीसाठी, तर सासू-सासरे मजुरीसाठी बाहेर गेले होते.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24