अहमदनगर Live24 टीम, 25 मार्च 2021:- महाराष्ट्र राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत चालला आहे. अहमदनगर जिल्ह्यात तर आज या वर्षातली सर्वात मोठी रुग्ण वाढ झाली आहे.
राज्यात कोरोनाची दुसरी लाट आली आहे. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत आहे. राज्यात नागरिक कोरोनाला गांभीर्याने घेत नसल्याचं पुन्हा अधोरेखीत झालं आहे. वारंवार आवाहन करुन देखील लोकांमध्ये निष्काळजीपणा कायम आहे.
गेल्या चोवीस तासात अहमदनगर जिल्ह्यात तब्बल 1338 रुग्ण वाढले आहेत. ह्या वर्षातील ही सर्वाधिक रुग्णवाढ आहे. अहमदनगर जिल्ह्यातील कोरोनाचा उद्रेक कायम असल्याचे आजही समोर आले आहे
गेल्या चोवीस तासात जिल्ह्यात आज 1338 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. त्यात नगर शहरात 457 रुग्णांचा समावेश आहे.
तालुकानिहाय रुग्णसंख्या पुढीलप्रमाणे –
अहमदनगर शहर 457, राहाता 140, संगमनेर 148, श्रीरामपूर 69, नेवासे 24, नगर तालुका 51, पाथर्डी 30, अकाेले 74, काेपरगाव 101, कर्जत 15, पारनेर 46, राहुरी 26, भिंगार शहर 14, शेवगाव 71, जामखेड 37, श्रीगाेंदे 19
आणि इतर जिल्ह्यातील 16 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले. जिल्हा रुग्णालयानुसार 511, खाजगी प्रयाेगशाळेनुसार 655 आणि रॅपिड चाचणीमध्ये 172 जणांना काेराेना संसर्गाचे निदान झाले आहे.