आमदार डॉ. किरण लहामटेंच्या बनावट ट्विटर अकाउंट वरून फेक पोस्ट

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम / अकोले :- कोरोनाचा अकोल्यात रुग्ण सापडला अशा आशयाचे ट्विट करणारी आ.डॉ. किरण लहामटे यांच्या अकौंटवरील पोस्ट फेक असून याची चौकशी करावी, अशा आशयाची तक्रार खुद्द आ. डॉ किरण लहामटे यांनी अकोले पोलीस ठाण्यात दिली आहे.

आ. डॉ. लहामटे यांच्या नावाने ट्विटरवरील पोस्ट गुरुवारी रात्री सामाजिक माध्यमावर फिरत होती. यानंतर डॉ. लहामटे यांना फोन येऊ लागले. तेव्हा त्यांना धक्काच बसला. त्यानंतर त्यांनी थेट अकोले पोलीस ठाणे गाठले व याबाबत लेखी तक्रार दिली.

त्यामध्ये म्हटले आहे की, माझे स्वत:चे नावे कोणतेही अधिकृत अकौंट नाही. असे असतानाही माझे नावे कोणीतरी अज्ञात व्यक्ती ट्विटर अकौंटचा वापर करून खोटेनाटे संदेश पसरवून बदनामी करीत आहे.

आज रोजी सदर ट्विटर अकौंटवरून कोरोना विषाणूबाबत अकोले तालुक्यात रुग्ण असल्याचे खोटे ट्विट करून वातावरण खराब करीत आहे. सदर व्यक्तीची तातडीने चौकशी करून कारवाई करावी, अशीही मागणी या पत्रात करण्यात आली आहे.

याबाबत अकोले पोलिसांनी सदर पत्र चौकशीसाठी सायबर शाखा अहमदनगर यांच्याकडे पाठविले आहे. तसेच अशा अफवा व चुकीचे संदेश पसरविणाऱ्यावर गुन्हे दाखल करण्यासाठी आ.डॉ. लहामटे यांनी अकोल्याचे तहसीलदार मुकेश कांबळे यांचीही आज भेट घेतली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24