अहमदनगर Live24 टीम, 12 जानेवारी 2021 :- गेल्या वर्षात अस्मानी संकट, कोरोना, पिकांना मिळालेला अल्प भाव यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला होता.
यातच श्रीगोंदे तालुक्यातील मांडवगण येथील अल्पभूधारक शेतकरी निवृत्ती चंद्रभान बोरुडे (४८) यांनी कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून नैराश्यातून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.
बोरुडे कुटुंबाची आर्थिक परिस्थिती अत्यंत हलाखीची आहे. त्यांना चार एकर कोरडवाहू शेती आहे. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची संपूर्ण जबाबदारी निवृत्ती यांच्यावर होती.
ते भाजीपाला विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. सततची नापिकी, मुलांचे शिक्षण, मुलीचे लग्न या चिंतेत ते असत. त्यातून ते कर्जबाजारी झाले होते.
त्यामुळे प्रचंड तणावाखाली होते. नैराश्यातून त्यांनी शेतात जाऊन विषारी औषध प्राशन केले. नगर येथे खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यामागे पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे.