डाळिंब विकण्यासाठी गेलेला शेतकरी बेपत्ता चार दिवसांपासून बेपत्ता !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,20 जून 2020 : संगमनेर बाजार समितीत मंगळवारी डाळिंब घेऊन गेलेला शेतकरी गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता आहे.

शिवदास राधाकिसन आंबरे (४०, गणोरे, ता. अकोले) असे त्यांचे नाव आहे.

कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेतला, पण ते सापडले नाहीत.

स्प्लेंडर मोटारसायकलीवरून (एमएच १४ एपी ६९७१) आंबरे बाजार समितीत गेले होते.

समितीत चौकशी केली असता त्यांनी डाळिंबाची पावती घेतल्याचे समजले.

मात्र, नंतर ते घरी आले नाहीत. शिवदास बेपत्ता झाल्याची खबर त्यांचा भाऊ रामनाथ यांनी पोलिसात दिली.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24