अहमदनगर Live24 टीम, 21 जानेवारी 2021 :-शासकीय तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने अत्यल्प भावात शेतकऱ्यांनी तूर विक्री करावी लागत आहे. यामुळे नेवासा तालुक्यात शासकीय तूर खरेदी केंद्र चालू करण्यात यावे अशी मागणीचे निवेदन भारतीय जनसंसदने दिले आहे.
दरम्यान यंदाच्या वर्षी तयार झालेल्या तुरीला बाजारात भाव वाढत आहेत. केंद्र सरकारने तुरीसाठी सहा हजार रुपये प्रतिक्विंटल हमीभाव जाहीर केला आहे.
मात्र, नेवासा तालुक्यात तूर खरेदी केंद्र चालू न झाल्याने कमी भावात शेतकऱ्यांनी तूर विक्री करावी लागत आहे, यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे.
यामुळे शेतकरी वर्गात नाराजी निर्माण झाली आहे. केंद्र सरकारच्या वतीने नाफेडमार्फत राज्यभरात खरेदी-विक्री संघ, कृषी उत्पन्न बाजार समिती, शेतकरी कंपन्या यांच्या माध्यमातून तूर, हरभरा, सोयाबीन, मका आदींची हमीभावाने खरेदी केली जाते.
त्यामुळे शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात आर्थिक फायदा होतो. हमीभाव खरेदीचा लाभ अनेक शेतकरी घेतात. सरकारने यावर्षी 6 हजार रुपये हमीभावाने तूर खरेदी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शेतकरी कंपन्यांनी ऑफलाईन नोंदणी सुरु केलेली आहे.