शेतकरी राजा अतिवृष्टीमुळे हतबल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर: निसर्गाच्या लहरीपणामुळे कधी शेतकरी दुष्काळात होरपळतो तर कधी शेतकऱ्यांना ओल्या दुष्काळाला सामोरे जावे लागते. शेतीवर सतत येणाऱ्या संकटांमुळे सर्वसामान्य शेतकरी पुरता हतबला झाला आहे.

यावर्षी पाथर्डी तालुक्यातील चितळी, साकेगाव, पागोरी पिंपळगाव, सुसरे आदी गावांना परतीच्या पावसाने चांगलाच तडाखा दिला आहे. सततच्या पावासामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील बाजरी, मका, भुईमूग, कापूस, कांदा पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, पाण्यामुळे पिके सडू लागली आहेत. मागीलवर्षी दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी होरपळा होता.

तर यावर्षी ओल्या दुष्काळाचे संकट शेतकऱ्यांवर कोसळले आहे. सततच्या पावसाने परिसरातील बाजरी, कापूस, सोयाबीन, मका पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पावसाने हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून नेल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24