कांद्याने केला शेतकऱ्यांचा वांधा ! भावात मोठी घसरण; आर्थिक अडचणीत वाढ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 :   कोरोनाचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांना बसला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊनमुळे बाजारपेठ बंद असल्याने शेतमाल शेतातच खराब झाला.त्यामुळे मोठया प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.

आता परत कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांपुढे आर्थिक अडचणीत वाढल्या आहेत. लॉकडाऊनमुळे आर्थिक अडचणीत असलेला शेतकऱ्यांनी आता बाजार सुरळीत झाल्याने कांदा विक्रीसाठी आणला आहे.

बाजार समितीच्या कांदा मार्केटमध्ये शुक्रवारी झालेल्या लिलावात १६ हजार ५३ कांद्याच्या गोण्यांची आवक झाली. आवक वाढल्यामुळे बाजारभावात मात्र घसरण झाली.

शुक्रवारी झालेल्या लिलावात एक नंबरच्या कांद्यास ६०० ते ८००, दोन नंबरच्या कांद्यास ३७० ते ३५०, तीन नंबरच्या कांद्यास १०० ते २५०, गोल्टी कांद्यास ३०० ते ५०० व जोड कांद्यास १०० ते १५० भाव मिळाला.

सध्या पाऊस सुरु आहे, पावसामुळे चाळीतला कांदा खराब होऊन नुकसान होईल. या भितीने कांदा उत्पादक शेतकरी कांदा विक्रीस आणत आहेत. मात्र कांद्याचे बाजारभाव गत सप्ताहापेक्षा सुमारे १५० रुपयांनी कमी झाले.

कांद्याची आवक वाढली असून, या कांद्याची रवानगी तामिळनाडू, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा राज्यात होत आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24