शेतकऱ्यांना इतर कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,15 ऑक्टोबर 2020 :- केदारेश्वरने चालू हंगामात पाच लाख मेट्रिक टन ऊस गाळपाचे उद्दिष्ट हाती घेतले आहे. तसेच ऊस उत्पादक शेतकऱ्यांना लगतच्या कारखान्याच्या बरोबरीने भाव देणार असल्याचे प्रतिपादन अध्यक्ष प्रतापराव ढाकणे यांनी व्यक्त केले आहे.

श्री केदारेश्वर साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा बॉयलर अग्निप्रदीपन संचालक तुषार वैद्य, त्यांच्या पत्नी छाया वैद्य यांच्या हस्ते झाले. गळीत हंगामाचा प्रारंभ लेखापरीक्षक किरण भंडारी यांच्या हस्ते झाला.

यावेळी उपस्थित ऍड. ढाकणे म्हणाले, यंदाच्या हंगामात अतिरिक्त उसाचे मोठे आव्हान आहे. सर्वांना मोठ्या जिद्दीने संघटितपणे या सगळ्या प्रसंगाला सामोरे जावे लागणार आहे.

सभासद, बिगरसभासद असा भेद न करता, सगळ्यांना एकसमान भाव देणार आहोत. यंदा निसर्गाने साथ दिल्याने, तीन वर्षे पोषक वातावरण निर्माण झाले असून, उसाचे क्षेत्र वाढणार आहे.

हे आव्हान सर्वांना एकत्रित पेलावे लागणार आहे.कामगारांना पुढील हंगामात नियमाप्रमाणे पगारवाढ करणार असल्याचे ऍड. ढाकणे यांनी जाहीर केले.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24