पीकविम्याचे पैसे न मिळाल्याने शेतकरी चिंतेत

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 नोव्हेंबर 2020 :-अतिवृष्टी व खराब हवामानाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांच्या खात्यात पीकविमा व शासनाने पंचनामा केलेल्या नुकसानीचे पैसे न आल्याने शेतकरीवर्गात निराशा आहे.

पीकविम्याचे पैसे भरून मोठा कालावधी झाला असताना शेतकऱ्यांच्या खात्यात एक रुपयाही आलेला नाही. अति पाऊस व खराब हवामानामुळे फळबागा व इतर पिकांच्या नुकसानीचे पंचनामे महसूल व कृषी विभागाने केले असले,

तरी अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा झालेले नाहीत. त्यामुळे शेतकरी निराश झाले आहेत. भाजीपाला व इतर पिकांचे भाव घसरल्यामुळे पुढील पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत.

शेतीला जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाची शेतकऱ्यांना चांगली मदत होते. मात्र, दुधालाही चांगला भाव नाही. बँकांकडून पीककर्ज मिळण्यातही अडचणी निर्माण होत आहेत.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24