अहमदनगर Live24 टीम ,28 जून 2020 : संगमनेर तालुक्यातील शिवापूर कोकणगाव शिवारात शेतातील वांगी पिकावर फवारणी करीत असताना शेतात पसरवलेल्या केबलला मुलाचा स्पर्श झाल्याने त्यास शॉक बसल्याने तो ओरडला.
मुलास ओढून बाजूला करीत वाचवत असताना वडील सुभाष जयवंत पारधी (वय ५५) यांना विजेचा शॉक बसल्याने त्यांचा मृत्यू झाला. शनिवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास ही घटना घडली.
शिवापूर कोकणगाव शिवारात मुलगा प्रवीण सुभाष पारधी हा शेतातील वांग्याच्या पिकावर फवारणी करीत होता. शेतात पसरवलेल्या केबलला प्रवीण पारधी याचा स्पर्श झाल्याने त्यास विजेचा शॉक बसला व तो ओरडला.
त्याचवेळी वडील सुभाष जयवंत पारधी हे मुलास वाचवण्यासाठी धावले. मुलास हाताने ओढून बाजुला करत असताना वडील सुभाष पारधी यांना शॉक बसल्याने ते गंभीर जखमी झाले.
त्यांना उपचारार्थ घुलेवाडी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, तत्पूर्वीच त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी हौशीराम पुंजा पारधी यांनी खबर दिली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews