अहमदनगर Live24 टीम,25 जुलै 2020 :- सध्या राज्यात कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. यावर अनेक उपाययोजना प्रशासन राबवत आहे. परंतु तरीही संक्रमणाचे प्रमाण जास्तच वाढत चालले आहे.
अहमदनगर जिल्ह्यातही कोरोनाने आपला फास आवळायला सुरवात केली आहे. या दुष्टचक्रात लोक अडकलेले असताना कोरोना रिपोर्टने भलतेच चक्रव्यूह या नागरिकांसमोर ठेवले आहे.
शासकीय लॅबमध्ये रिपोर्ट यायला आठ दिवस उशीर लागत असल्यामुळे खासगी लॅबला शासनाने परवानगी दिली. मात्र गेल्या काही दिवसातील त्यांचे अहवाल हे विश्वसनीय वाटत नसल्याने लोक संभ्रमात सापडले आहेत.
कोणताही त्रास नसताना पॉझिटिव्ह अहवाल ही एक नित्याची बाब झाली आहे. तसेच शासकीय ठिकाणी चेकिंग केल्यावर येणार रिपोर्ट आणि खासगीमध्ये येणारा रिपोर्ट यात तफावत जाणवत आहे.
कोरोना रोगाची विनाकारण कोणीही भीती बाळगू नये. अहवाल जरी पॉझिटिव्ह आला तरी योग्य प्रकारे उपचार करून घ्यावेत. न घाबरता धैर्याने या परिस्थितीचा सामना करावा, असा सल्ला वैद्यकीय तज्ज्ञांनी दिला आहे.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा
ahmednagarlive24@gmail.com