धक्कादायक : ‘या’ धार्मिकस्थळाच्या ठिकाणी परदेशी नागरिक आढल्याने खळबळ,तिघांविरोधात गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर लाईव्ह24 टीम :- देशभर संचारबंदी असताना येथील जामखेड तालुक्यातील काझी गल्लीतील धार्मिकस्थळाच्या ठिकाणी परदेशी नागरिक आढळून आहे आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी संबधित ट्रस्टच्या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. १४ मधील १० जण परदेशातून आले असल्याने प्रशासन हादरले आहे.

यातील दहा जण आशिया खंडातील आयव्हरी कोस्ट, इराण, व टांझानिया देशातील तर इतर चार जण मंबई व तमिळनाडू राज्यातील आहेत.

या प्रकरणी पोलिस हेडकॉन्स्टेबल संदीप मच्छिंद्र आजबे यांनी फिर्याद दाखल केली आहे.

२५ मार्च रोजी धार्मिकस्थळामध्ये १४ लोक एकत्र जमवून जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचे उल्लंघन केले. ‘

करोना’ या घातक रोगाचा फैलाव होईल हे माहीत असतानाही त्यांनी हा जमाव जमवला.

यावरून वरील तीन जणांविरोधात १८८ नुसार कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

धार्मिकस्थळे उघडी ठेवण्यास बंदी आहे. असे असतानाही धार्मिकस्थळाच्या ठिकाणी १४ लोक एकत्र आल्याने नागरिकांमधून आश्चर्य व्यक्त केले जात आहे. 

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर

This Story First Publish on Ahmednagarlive24.com®

No1 News Network Of Ahmednagar™

जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24