फेस्टिव्ह ऑफर ; जिओ, एअरटेल आणि Vi ने आणले ‘हे’ स्वस्त प्लॅन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,24 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाउन काळामध्ये डेटा यूज जास्त प्रमाणात वाढल्याने अनेक टेलिकॉम कंपन्यानी ग्राहकांनी आकर्षित करण्यासाठी नवनवीन प्लॅन बाजारात आणले. जिओ, व्होडाफोन-आयडिया, एअरटेल या खासगी कंपन्यांनी भरघोस फायदा देणारे प्लॅन बाजारात आणले. याला टक्कर देण्यासाठी सरकारी टेलिकॉम कंपनी BSNL नेही अनेक प्लॅन आणले होते.

आता तुमच्यासाठी जिओ, एअरटेल आणि व्होडाफोन आयडिया ने स्वस्त प्लॅन आणले आहेत. 200 रुपयांच्या खाली किंमतीच्या योजना आणल्या आहेत, ज्यामध्ये डेटा व कॉलिंगचे फायदे उपलब्ध असतील.

जिओचा 149 रुपयांचा रिचार्ज प्लॅन :- देशातील सर्वात मोठी टेलिकॉम कंपनी जिओच्या 149 रुपयांच्या रिचार्ज योजनेत ग्राहकांना दररोज 1 जीबी डेटा मिळतो. या योजनेत आपणास जिओकडून जिओ टू जिओ अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि अन्य नेटवर्कवर कॉल करण्यासाठी जियोकडून 300 कॉल मिनिटे मिळतात. योजनेची वैधता 24 दिवसांची आहे. आपल्याला सर्व Jio अॅप सब्सक्रिप्शन सह दररोज 100 एसएमएस देखील मिळतील.

जिओचा 199 रुपयांचा रिचार्ज प्लॅन:-  ही योजना 28 दिवसांसाठी वैध आहे. या योजनेत आपल्याला दररोज 1.5 जीबी डेटा आणि 100 एसएमएस मिळतील. त्याचबरोबर, जिओ टू जिओ अनलिमिटेड व्हॉईस कॉलिंग आणि जिओ टू नॉन-जिओ नेटवर्कवर कॉल करण्यासाठी देखील 1000 मिनिटे प्रदान केली जातील. याव्यतिरिक्त, आपल्याला सर्व Jio अॅप्सची सदस्यता देखील मिळेल.

 एअरटेलचा 199 रुपये रिचार्ज प्लॅन :- एअरटेलची 199 रुपयांची योजना आहे, ज्यामध्ये दररोज 1 जीबी डेटा अमर्यादित कॉलिंग लाभ मिळतो आणि तो देखील सर्व नेटवर्कवर. या योजनेची वैधता 24 दिवस आहे. आपल्याला दररोज 100 एसएमएस देखील मिळतात. याशिवाय तुम्हाला हॅलोट्यून्स, विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सस्ट्रीमचीही सबस्क्रिप्शन मिळेल.

एअरटेलचा 179 रुपये रिचार्ज प्लॅन:-  या योजनेत तुम्हाला 28 दिवसांसाठी अमर्यादित कॉलिंग आणि 300 एसएमएस मिळतील. आपल्याला 28 दिवसांसाठी एकूण 2 जीबी डेटा मिळेल. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे भारती एक्सा लाइफ इन्शुरन्स 2 लाख रुपये आहे, जो तुम्हाला विनामूल्य मिळेल. तसेच, फ्री हॅलोट्यून्स, विंक म्युझिक आणि एअरटेल एक्सस्ट्रीमच्या सदस्यता आहेत.

वीआआयचा 199 रुपये रिचार्ज प्लॅन :- वीआय (पूर्वी व्होडाफोन आयडिया म्हणून ओळखले जाणारे) च्या दोन योजना आहेत ज्याची किंमत 200 रुपयांच्या खाली आहे. यातील पहिले 199 रुपये आहेत जे 24 दिवसांच्या वैधतेसह येतात. या योजनेत आपल्याला दररोज 1 जीबी डेटा, अमर्यादित व्हॉईस कॉलिंग आणि 100 एसएमएस मिळतात. आपणास vi मूवीज आणि टीव्हीचे फ्री एक्सेस देखील मिळेल.

वीआआयचा 149 रुपये रिचार्ज प्लॅन:-  149 रुपयांच्या या योजनेत ग्राहकांना अमर्यादित व्हॉईस कॉलिंगची सुविधा आणि 300 एसएमएस मिळतील, जे 28 दिवसांसाठी वैध राहतील. आपल्याला एकूण 3 जीबी डेटा मिळेल. यात vi मूवीज आणि टीव्ही एक्सेस असेल.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24