श्रीरामपूर तालुक्यात राजकीय पदाधिकाऱ्यांत मारामारी !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,4 सप्टेंबर 2020 :- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर ग्रामपंचायतीत गुरूवारी जि. प. सदस्य शरद नवले व बाजार समितीचे संचालक सुधीर नवले यांच्यात शाब्दिक खडाजंगी झाली.

त्याचे पर्यवसान नंतर मारामारीत झाले. सकाळी सुधीर नवले ग्रामपंचायत कार्यालयात बसले असताना शरद नवले तेथे आले. आता ग्रामपंचायतीत प्रशासक आले आहेत, तुम्ही येथे काय करता? असा सवाल त्यांनी केला.

त्यावरून बाचाबाची व नंतर मारामारी झाली. श्रीरामपूर पोलिस ठाण्याचे दत्तात्रय उजे, बेलापूर पोलिस ठाण्याचे साईनाथ राशीनकर, रामेश्वर ढोकणे, पोपट भोईटे, निखिल तमनर, हरिश पानसंबळ यांनी हस्तक्षेप करून वादावर पडदा टाकला.

पोलिस उपअधीक्षक राहुल मदने व निरीक्षक श्रीहरी बहिरट यांनी घटनास्थळी भेट दिली. शरद नवले, सुधीर नवले, अनिल नवले, नितीन नवले यांच्याविरोधात पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई केली.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24