अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- अवसायनात निघालेली पूर्वश्रमीची रावसाहेब पटवर्धन व आताची प्रवरा नागरी सहकारी पतसंस्थेच्या संचालकानी राजीनामे दिलेले आहेत , त्यामुळे ठेवीदारांच्या ठेवी मिळणे अवघड झाले आहे.
सदर पतसंस्थेच्या ठेवीदारांनी निवेदन द्वारे संचालकांवर (महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसंबंध संरक्षण) अंतर्गत गुन्हे करावेत, अशी मागणी ठेवीदार कृती समितीच्या वतीने करण्यात आली आहे.
सहकार विभागाचे जिल्हा उपनिंबधक दिग्विजय आहेर यांना ठेवीदार कृती समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या पतसंस्थेत बहुतांशी ठेवीदार हे ज्येष्ठ नागरिक हे ठेवीदार असून त्यातील बहुतेक व्याधीग्रस्त आहेत.
ठेवीदारांना तातडीने ठेवी मिळाल्या पाहीजेत. विशेष म्हणजे सध्या ही पतसंस्था प्रवरा नागरी सहकारी संस्थेची असून, त्यांनी देखील राजीनामे दिले आहेत.
त्यामुळे ठेवी मिळताना अडचणी येणार आहेत.त्यामुळे या पतसंस्थेच्या संचालकांवरच गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com