अखेर माजी खासदार दिलीप गांधी यांच्या विरोधात गुन्हा दाखल !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 डिसेंबर 2020 :-नगर अर्बन बँकेतील अपहार प्रकरणी माजी खासदार दिलीप गांधी यांच्यासह बँकेच्या तत्कालीन संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बॅंकेचे अधिकारी मारुती औटी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात हा गुन्हा नोंदविला आहे. दिनांक ७ ऑक्टोंबर २०१७ ते १० नोव्हेंबर २०२० पर्यंतच्या अहवालाची चौकशी बँकेच्या प्रशासक अधिकाऱ्यांनी सादर केली आहे.

यामध्ये भळगट यांनी एक कोटी ४७ लाख या नोंदीबाबत आक्षेप घेतलाय ही नोंद चुकीची असून त्याबाबत गांभीर्याने चौकशी होणे आवश्यक असल्याचे नमूद केले ,

त्याचप्रमाणे रिझर्व बँकेच्या तपासणी अहवालात देखील सदरची बाब गंभीर असल्याचे निदर्शनास आले. सदरचे कृत्य बेकायदेशीर असून बँकेचे अधिकारी घनश्याम बल्ला चेअरमन दिलीप गांधी आणि संचालक मंडळ त्यांनी कट रचून बँकेचे फसवणूक करून कोणतीही रक्कम भरणा आलेला नसतानादेखील तो भरून आलेला आहे

अस दर्शवून खाते नियमित आहे असं दाखवून कर्जखात्याची नूतनीकरण कर्ज मंजूर केले व गैर उद्देशाने स्वतःचा फायदा करून घेण्यासाठी वाढीव खर्च रक्कम देऊन बँकेच्या निधीचा अपहार केला. स्वतःच्या अधिकारांचा गैरवापर करून अवास्तव आणि १३ खोटे कर्ज मंजूर केलेले आहे

आणि त्याद्वारे बँकेची बँकेच्या रकमेची चोरी अफरातफर व फसवणूक केली आहे त्यामुळे वरील सर्व विरुद्ध भारतीय दंड विधान कलम ४०६,४२०,४६५,४६७ ४७१ व १२० ब या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अहमदनगर लाईव्ह 24