नवी दिल्ली : राजधानीत अनाज मंडी भागात एका चार मजली इमारतीतील फॅक्टरीला रविवारी पहाटे आग लागली. आगीत ४३ जणांचा मृत्यू झाला.
बहुतांश मृत्यू गुदमरून झाले आहेत. पोलिसांनुसार शॉर्टसर्किटमुळे ही आग लागली. या आगीत मुशर्रफ नावाचा मनुष्य अडकून पडला.
त्याने पहाटे ५ वाजता आपला मित्राला फोन लावला. तो मित्राला म्हणाला, भय्या, मी आज मरतोय. आग लागली आहे.
करोलबागला ये. वेळ खूप कमी आहे आणि बाहेर पडण्याचा मार्ग नाही. भय्या, मी संपलोय… कुटुंबाची काळजी घे. आता श्वासही घेता येत नाही.’