अहमदनगर लाईव्ह 24 टीम / श्रीगोंदे : मांडवगण येथील बशीर रेहमान काझी यांचे छपराचे घर शेतीच्या वादातून १७ ला रात्री त्यांच्या नातेवाईकांनी पेटवले. सुदैवाने काझी व त्यांचे कुटुंबीय घरी नसल्याने मोठी हानी टळली.
बशीर रेहमान काझी यांचा त्यांचे नातेवाईक बादशू इसमाईल शेख, मुश्ताक इनामदार यांच्याशी शेतीबाबत वाद आहे. या वादातून १६ डिसेंबरला हमीद शेख व बादशू इस्माईल शेख यांनी बशीर काझी यांच्या घरी येऊन ‘तुझ्या मामाच्या मुलीला घरी येऊ देऊ नको, नाही तर परिणाम वाईट होतील’ अशी धमकी दिली.
दुसऱ्या दिवशी रात्री बादशू इस्माईल शेख, समीर इनामदार, हमीद शब्बीर शेख, रफिक शेख (सर्व मांडवगण) यांनी शेतात येऊन छप्पर पेटवून दिले, असे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी संबंधितांवर गुन्हा दाखल केला आहे.