जिल्ह्यात दिवसभरात कोरोनामुळे पाच जणांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 जानेवारी 2021 :- नगर जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी पाच जणांचा मृत्यू झाल्याने बळींची एकूण संख्या १ हजार ५३ झाली. दरम्यान गेल्या २४ तासात नव्याने ९९ कोरोनाबाधितांची भर पडली आहे.

तर काल दिवसभरात १४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६७ हजार ४४३ झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण ९७.०८ टक्के आहे.

तर ९९ रुग्णांची भर पडल्याने उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता ९७८ इतकी झाली आहे. जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती आकडेवारीमध्ये

  • बरे झालेली रुग्ण संख्या:६७४४३
  • उपचार सुरू असलेले रूग्ण: ९७८
  • मृत्यू:१०५३
  • एकूण रूग्ण संख्या:६९४७४
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24