Ahmednagar Breaking : बायोगॅसची स्लरी सोडण्यात आलेल्या विहिरीत पाच जण बुडाले. तर ग्रामस्थांनी एक जणाला वाचविले. त्याची प्रकृती गंभीर आहे. ही घटना नेवासा तालुक्यातील वाकड़ी या गावात मंगळवारी (दि. ९ एप्रिल) गुढीपाडव्याच्या दिवशी सायंकाळी पाच वाजता घडली आहे. या घटनेने नेवासा तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी, की नेवासा तालुक्यातील वाकडी या गावात येथील एका शेतकऱ्याने बायोगॅसची शेनाची स्लरी एका जुन्या विहिरीत सोडली होती. सायंकाळी पाच वाजता वा विहिरीत मांजर पडले. ते काढण्यासाठी गोगेश अनिल काळे हा तरूण तेथे गेला व विहिरीत पडला, मात्र स्लरी खोलवर असल्याने तो बुडाला.
त्याला वाचविण्यासाठी अनिल काळे (वय ५८) यांनी उड़ी घेतली. तेही बुडायला लागले म्हणून त्यांना वाचविण्यासाठी माणिक काळे (वय ६५) यांनी उडी मारली तेही बुडायला लागल्यावर संदीप काळे (वय ३६) व त्यांच्या नंतर बाचासाहेच पवार यांनीही उडी मारली.
त्यांचा आरडा ओरडा ऐकून विजय काळे यांनी पायाला दोर बांधला व नंतर विहिरीत उडी मारली; परंतु तेही बुडायला लागले. हा प्रकार ग्रामस्थांना समजताच ग्रामस्थांनी दोरच्या मदतीने त्यांना बुडण्यापासून वाचविले.
ही घटना आसपासच्या ग्रामस्थांना समजताच त्यांनी घटनास्थळी भाष घेतली, ग्रामस्थांनी नेवासा पोलिसांना घटनेचाबत खबर दिली. नेवासा पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसंनी ग्रामस्थांच्या मदतीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
यात एका जणाला वाचविण्यात आले असले, तरी त्याची प्रकृती गंभीर आहे. उपचारासाठी त्याला अहंमदनगर येथील रुग्णालयात हलविण्यात आले. तर उरलेल्या पाच जणांचा शोध रात्री उशिरापर्यंत पोलीस व ग्रामस्थ घेत होते.
या ठिकाणी गावातील पोलीस पाटील, नेवासा पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी, तसेच भाजपचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. ऐन गुढीपाडवा सणाच्या दिवशी घडलेल्या या घटनेने कुकाणा परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मदत कार्यात अडथळे
ज्या विहिरीत शेणाची स्लरी सोडण्यात आली होती ती विहीर २०० फूट खोल असून निम्म्यापेक्षा जास्त भरलेली आहे. स्लरीमुळे येणारा शेणाचा वास व तवार झालेला वायू यामुळे बुडालेल्या लोकांना शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे निर्माण झाले आहे.
लाकडे, दोर व इतर साहित्याच्या मदतीने बुडालेल्या पाच जणांचा पोलीस व ग्रामस्थ शोध घेत होते.