अहमदनगर शहरातील ‘ह्या’ प्रसिद्ध दुकानावर अन्न व औषध प्रशासनाचा छापा; होत होते ‘असे’ काही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 5 नोव्हेंबर 2020 :- अहमदनगर शहरातील विविध पदार्थांसाठी विशेषतः दिवाळी फराळसाठी प्रसिद्ध असलेले मे. हेमराज फुड्स, केटर्सचे दुकान व गोदामावर अन्न औषध प्रशासनाने छापा टाकला.

सदर कारवाई मंगळवारी सायंकाळी केली गेली. याठिकाणी मुदतबाह्य अन्नपदार्थ आढळून आले आहेत. अन्नपदार्थ तपासणी दरम्यान विश्वजीत हेमराज बोरा व त्याचा लहान बंधू

यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना दमदाटी करून त्यांच्या अंगावर धावून गेले. गोदामातील मालाची फेकाफेक करून आरडाओरड केली.

काय आढळले तपासणीदरम्यान :- याठिकाणी मुदतबाह्य झालेली मिरची पावडर, व्हिनेगार, रामबंधू चिवडा मसाला, प्रकाश चिवडा मसाला, काळी मिरी मसाला, व्हिनेगार व्हाईट, लेमन स्क्वॅश, समाधान डिस्को पापड, शुभश्री जिरा खाकरा,

बदाम थंडाई सिराफ, पायनापल स्क्वॅश आदी अन्नपदार्थांचे दीडशेपेक्षा जास्त पोकेट्स व 74 बॉटल्स जप्त केल्या आहेत. या मुदतबाह्य अन्नपदार्थांपासून हेमराज केटर्स येथे दिवाळीचे फराळ व मिठाई तयार होत असल्याचेही यावेळी अधिकाऱ्यांना आढळून आले.

मोटारसायकलच्या भावात मिळतिये मारुती कार ; ‘अशी’ करा खरेदी

वाचा सविस्तर बातमी लिंकवर 👇🏻
https://bit.ly/34XPq5a

Posted by Ahmednagarlive24.com अहमदनगर ब्रेकिंग न्यूज on Wednesday, November 4, 2020

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24