शेतकऱ्यांसाठी आमदार काळेंनी ठेकेदाराला झापले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 27 नोव्हेंबर 2020 :-कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे ज्या ठिकाणी प्रत्यक्षात काम सुरू आहे. त्या परिसरातील रस्त्यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे.

या महामार्गाच्या कामामुळे अनेक प्रकल्पबाधित शेतकऱ्यांचे होत असलेले नुकसान व खराब झालेल्या रस्ते दुरुस्तीकडे समृद्धी महामार्ग व्यवस्थापन दुर्लक्ष करीत आहे.

त्यामुळे ग्रामस्थांनी व प्रकल्पबाधित शेतकऱ्यांनी दोन दिवसांपूर्वी समृद्धी महामार्गाचे काम बंद पाडले होते. याची दाखल घेत तातडीने आमदार आशुतोष काळे यांनी शेतकऱ्यांच्या समस्यांचे निवारण केले आहे.

कोपरगाव तालुक्यातून जात असलेल्या समृद्धी महामार्गामुळे संबंधित परिसरातील रस्त्यांची अक्षरश दुर्दशा झाली आहे. तसेच येथील प्रकल्पबाधित शेतकऱ्यांना येत असलेल्या अडचणीं मुळे शेतकऱ्यांनी येथील काम बंद पाडले होते.

याची दखल घेत आमदार आशुतोष काळे यांनी गायत्री प्रोजेक्टस् कंपनीचे उपाध्यक्ष के. एस. रेड्डी यांना कर्मवीर शंकरराव काळे साखर कारखाना कार्यस्थळावर बोलावून घेऊन यापुढे प्रकल्पबाधित व परिसरातील शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ देऊ नका, अशी समज दिली.

आमदार काळे यांनी एमएसआरडीसीचे मुख्य कार्यकारी संचालक राधेश्याम मोपलवार यांची भेट घेतली. खराब रस्ते दुरुस्त करण्याबाबत गायत्री प्रोजेक्टस् कंपनीला आदेश द्यावेत, अशी मागणी केली.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24