ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : जबरी चोरी ! १४ तोळे दागिन्यासह २५ हजार लंपास

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : राहुरी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील वाकाण वस्ती रोडवरील वाळूंज यांच्या बंगल्यात अज्ञात चोरट्यांनी घुसून चाकूचा धाक दाखवत १४ तोळे सोन्याचे दागिने व २५ हजार रुपये चोरून जबरी चोरी केली.

बुधवारी रात्रीच्या सुमारास झालेल्या या जबरी चोरीच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, देवळाली प्रवरा परिसरातील वाकण वस्ती रोड येथे दत्तात्रय पंढरीनाथ वाळुंज यांचा बंगला असून अज्ञात तीन ते चार चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास सदर बंगल्यात घुसले.

दत्तात्रय वाळुंज यांची कन्या अनिता ज्या खोलीत झोपलेल्या होत्या. त्या खोलीच्या दरवाजासमोर उभे राहिले. अनिता यांना आवाज आल्याने त्यांनी दरवाजा उघडताच पूर्णपणे तोंड बांधलेले केवळ डोळे दिसत होते.

हाताला ग्लोज असलेले चोरटे दिसताच त्यातील एका चोरट्यांनी अनिता यांना चाकू लावला असता, त्या बेशुद्ध पडल्या. त्यानंतर शुद्धीवर आल्यानंतर अनिता हिने घरातील सदस्यांकडे धाव घेतली. घरच्यांनी एकच रडारड सुरू केली. यवेळी घरातील कपाटांची उचकापाचक झाल्याचे दिसून आले.

चोरीच्या घटनेत वाळूज यांच्या घरातील १४ तोळे सोने व २५ हजार रुपये रोकड लंपास झाल्याचे दत्तात्रय वाळुंज यांनी सांगितले. घटनेची माहिती समजताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव व सहकारी तसेच अहमदनगर येथील श्वान पथक व ठसे तज्ञ घटनास्थळी दाखल होत तपासाच्या दृष्टीने हालचाली सूरु केल्या.

शहरातील विविध भागांतील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी संकलित केले आहे.दरम्यान, याबाबत पंकज आण्णासाहेब वाळूज यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. जबरी चोरीच्या घटनेमुळे परिसरातील शेतकरी वर्गात घबराट पसरली आहे.

Ahmednagarlive24 Office