अहमदनगर Live24 टीम,22 ऑक्टोबर 2020 :- लॉकडाऊन कालखंडात उत्पन्नाचे साधन नव्हते. त्यामुळे घर व पाणीपट्टी भरणे जिकिरीचे झाले आहे.
संगमनेर नगरपालिकेने या काळातील कर माफ करावा, अशी मागणी भाजपने मुख्याधिकारी डॉ. सचिन बांगर यांच्याकडे केली. पालिकेने घरपट्टीवर दंड व्याज आकारले आहे.
मासिक २ टक्के व्याजाची आकारणी माफ करावी, घरपट्टी भरण्यासाठी मुदतवाढ द्यावी, आठ दिवसांत विशेष सभा बोलावून ठराव करावा, अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा नगरसेवक मेघा भगत, शहराध्यक्ष अॅड. श्रीराम गणपुले,
जावेद जहागीरदार, संजय नाकील, रामचंद्र जाजू, राजेंद्र सांगळे, दीपक भगत, शिरीष मुळे, ज्ञानेश्वर कर्पे, सीताराम मोहरीकर, प्राजक्ता बागूल, विठ्ठल शिंदे, सुनील खरे, मनोज जुंदरे, दिपेश ताटकर, संतोष पठाडे आदींनी निवेदनाद्वारे दिला आहे.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved