अहमदनगर Live24 टीम,21 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यातील समशेरपूर येथील उद्योजक व माजी जि. प. सदस्य बाजीराव दराडे यांना अॅट्राॅसिटीच्या गुन्ह्यात ताबडतोब अटक करा,
त्यांची पत्नी जि. प. सदस्य सुषमा दराडे यांना सहआरोपी करा, या मागणीसाठी मंगळवारी अकोल्यात आदिवासी समाजाने मोर्चा काढला.
शेणीत येथील सामाजिक कार्यकर्ते नामदेव आनंदा डामसे यांनी १५ आॅक्टोबरला दराडे यांच्याविरोधात तक्रार दिली. पोलिस दराडे यांना पाठीशी घालत आहेत.
संबंधित पोलिसांवर कारवाई करावी व सुषमा दराडे यांना सहआरोपी करावे, अशी मागणी करत आदिवासींवरील दडपशाही खपवून घेणार नाही, अशा घोषणा देत मोर्चा तहसील कार्यालयावर नेण्यात आला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved