माजी आ.कर्डिले यांची ऊर्जामंत्री ना.तनपुरे यांच्यावर टीका, म्हणाले त्यांना…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 ,9 जून 2020 :  कोरानाच्या पार्श्वभूमीवर सर्वच क्षेत्रातील नागरिकांनी मदत केली. मात्र, मी करत असलेल्या मदतीला सत्ताधार्‍यांनी आक्षेप घेत समाजकार्य करण्यातही खोडा घातला.

सत्ताधार्‍यांना आमच्या चांगल्या कामाचे भय वाटते, अशी टीका माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी ऊर्जामंत्री प्राजक्त तनपुरे यांचे नाव न घेता केली. चिचोंडी शिराळ (ता.पाथर्डी) येथे गरजूंना माजी आ.कर्डिले यांच्या हस्ते किराणा वाटप करण्यात आला. यावेळी बोलत होते.

यावेळी ते म्हणाले कि, मदत करताना आम्हाला जाहिरातबाजी करायची नव्हती म्हणून आम्ही ते पैसे थेट रेशन दुकानदाराला देणार होतो. त्यामुळे कोणत्याही माणसाला मदत कशी मिळाली, हे समजणार नव्हते.

प्रत्येकाला मदत मिळेल, हा उद्देश ठेवून आम्ही सोसायटीचे पैसे भरण्याचे ठरवले. मात्र, सत्ताधार्‍यांनी अधिकाऱ्यांना सांगून आमचे पैसे घेण्याचे नाकारले.

सत्ताधार्‍यांना आमच्या चांगल्या कामाचे भय वाटते, अशी टीका कर्डिले यांनी केली. पाथडी, नगर, राहुरी तालुक्यातील संपूर्ण मतदारसंघामध्ये किराणा वाटप आम्ही केल्याचे सांगून कोरोनाला हद्दपार करा, असे आवाहनही केले.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24