माजी आमदार शिवाजी कर्डिले म्हणाले कुणी कर्जाला अडवले, तर मला फोन करा…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,18 ऑक्टोबर 2020 :-जिल्हा बँकेचे नेतृत्व अनेक नेत्यांनी केले. मात्र बँकेत कधी राजकारण केले नाही. बँकेत पक्ष, गट-तट पाहिले जात नाही. शेतकरी केंद्रबिंदू म्हणून काम, पूर्वीच्या नेत्यांनी दिलेला आदर्शानुसार काम करत आहोत.

अडचणीत आलेल्या कारखान्याला मदत केली. राज्य बँकेवर प्रशासक असल्याने कर्ज मिळताना अडचणी आल्या असताना अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेने जिल्ह्यातील कारखान्याना जास्तीत जास्त कर्ज उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला असून कर्मयोगी कुंडलीकराव जगताप (कुकडी) सहकारी साखर कारखान्याला इथेनॉल निर्मिती प्रकल्पाच्यासाठी अजून कर्ज देणार असल्याचे प्रतिपादन माजी आमदार जिल्हा बँकेचे संचालक शिवाजी कर्डिले यांनी शनिवारी केले.

कर्मयोगी कुंडलीकराव रामराव जगताप पाटील (कुकडी) सहकारी साखर कारखाना १७ वा गळीत हंगामाचा शुभारंभ माजी आमदार शिवाजी कर्डिले आणि आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी कर्डिले म्हणाले, कुकडी कारखान्याला जिल्हा बँकेने कर्ज उपलब्ध करून दिले. आणखी इथेनॉल प्रकल्पाला कर्ज उपलब्ध करून दिले जाईल. त्यासाठी लवकर प्रस्ताव पाठवा.

तसेच मागील हंगामात राहिलेले पैसे ही आता २५ तारखेपर्यंत देणार, असे राहुल जगताप यांनी सांगितले. पंतप्रधान नरेंद मोदी यांनी पॅकेज जाहीर केले असल्याने खेळते भांडवल म्हणून एका गाईला किमान पंधरा हजार खेळते भांडवल दहा गाईपर्यंत दिले जात आहे. बँकेतून तीन लाख पर्यंत बिनव्याजी कर्ज, मध्यम मुदत कर्ज देण्यासाठी अट शिथिल केली. जिल्हा बँकेची शेतकऱ्यांची बँक अशी ओळख करून दिली. पाहिले संचालक चिठ्ठीशिवाय कर्ज भेटत नव्हते.

आता कुणाची चिठ्ठी लागत नाही. ही प्रथा बंद केली. कुणी कर्जाला अडवले, तर मला फोन करा. शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे काम शंभर टक्के केले पाहिजे. विखेच्या कारखान्याला कर्ज दिले. डिसेंबरमध्ये निवडणूक आहे. राहुल, संग्राम राष्ट्रवादीचे असले तरी अडवण्याची भूमिका नाही. आमदार संग्राम जगताप म्हणाले, कारखाना अध्यक्ष राहुल जगताप हे शेतकऱ्यांसाठी संघर्ष करत आहेत.

यावेळी जिल्हा बँक उपाध्यक्ष रामराव वाघ, बाबासाहेब भोस यांची भाषण झाले. रावसाहेब वरपे, मनोहर पोटे, अण्णासाहेब शेलार, संजय जामदार, हरिदास शिर्के, दीपक भोसले, अभिलाष घिगे, बाळासाहेब उगले उपस्थित होते

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24