अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- माजी आमदार शिवाजी कर्डिले यांनी मागील पाच वर्षांत पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी भागासाठी सर्वाधिक निधी आणला. त्यांचे ऋण कधीही विसरता येणार नाही, असे पंचायत समितीच्या सभापती सुनीता दौंड यांनी सांगितले.
चिचोंडी शिराळ ग्रामपंचायतीतर्फे आयोजित हळदी कुंकू कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी अलका शिवाजी कर्डिले होत्या. पं. स. उपसभापती मनीषा वायकर, सदस्य गंगुबाई आटकर, सरपंच कलावती आटकर, अनिता आटकर,
मोनाली खलाटे, मीराबाई आव्हाड, अंबिका दानवे, वैशाली गरुड, शारदा आव्हाड, सोनाली फुलमाळी, अनुजा कुदळे, अमृता भिंगारदिवे, यांच्यासह शिराळ, डोंगरवाडी, गीतेवाडी, डमाळवाडी, धारवाडी येथील महिला यावेळी उपस्थित होत्या.
दौंड म्हणाल्या, विकासकामे करणाऱ्यांचे ऋण कधी विसरता येणार नाहीत. अलका कर्डिले म्हणाल्या, हळदीकुंकू समारंभामुळे महिलांचे संघटन अधिक प्रभावी होते. अशा कार्यक्रमाचे गावोगावी आयोजन व्हावे.
कार्यक्रमाचे आयोजक मिरी-तिसगाव नळ योजनेचे अध्यक्ष एकनाथ आटकर म्हणाले, शिवाजी कर्डिले यांच्या माध्यमातून चिचोंडीसाठी तीन कोटींचा निधी मिळाला. गावाच्या विकासात त्यांचे मोठे योगदान आहे.