व्हीआरडी स्थलांतराबाबत माजी खासदार दिलीप गांधींचे महत्वपूर्ण वक्तव्य

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :-व्हीआरडीई स्थलांतरीत होऊ नये यासाठी पंतप्रधान, केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, डिफेन्स कमिटीचे सदस्य शरद पवार यांच्याकडे पाठपुरावा केला होता. त्याला यश आले.

सोमवारी रात्री राजनाथ सिंह यांनी मला फोन करून व्हीआरडीई स्थलांतरीत करणार नाही, असे आश्वासन दिले, अशी माहिती माजी खासदार दिलीप गांधी यांनी दिली.

यावेळी दिलीप गांधी म्हणाले कि, व्हीआरडीई ही संरक्षण संस्था नगरचे वैभव आहे. 1980 पासून माझे या संस्थेशी ऋणानुबंध आहे.

या महत्वपूर्ण संस्थाचे नगर मधून स्थलांतरित होवू नये यासाठी मी शांत न बसता पुढाकार घेणार असल्याचे आधीच घोषित केले होते.

त्यानुसार मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राज्यमंत्री श्रीपाद नाईक, संरक्षण खात्याच्या समितीचे सदस्य व राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार तसेच डी.आर.डी.ई.चे चेअरमन सतीश रेड्डी, पुण्याचे जनरल डायरेक्टर पी.के.मेहता यांना तातडीने वैय्यक्तिक इमेल करून पत्र व्यवहार केला आहे.

सोमवारी दुपारी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांच्याशी संपर्क साधून सविस्तर माहिती दिली. रात्री संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी इमेल वाचल्यावर त्यांचा दिल्लीहून मला फोन आला, त्यावेळी त्यांना नगरमध्ये व्ही.आर.डी.ई राहणे किती महत्वाचे आहे.

याची माहिती देवून संस्थाचे नगर मधून स्थलांतरित होवू नये अशी विनंती केली. यावेळी मंत्री राजनाथ सिंग यांनी नगर मधून व्ही.आर.डी.ई संस्थाचे स्थलांतर होणार नसल्याचे आश्वासन दिले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24