शिर्डी :- लोकसभा मतदारसंघात मित्रपक्ष असलेल्या शिवसेनेचे अधिकृत उमेदवार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात अपक्ष उमेदवारी करणारे माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची भाजपमधून अखेर हकालपट्टी करण्यात आली.
पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्या सूचनेनुसार वाकचौरे यांच्यावर ही कारावाई करण्यात आली.
लोकसभेच्या महाराष्ट्रातील सर्व जागा भाजप, शिवसेना एकत्रित लढवत आहेत. नगर जिल्ह्यातील शिर्डी लोकसभा मतदारसंघातून शिवसेनेने विद्यमान खासदार लोखंडे यांना उमेदवारी दिली आहे.
या मतदारसंघातून सध्या भाजपमध्ये असलेले माजी खासदार वाकचौरे यांनी बंडखोरी करत लोखंडे यांच्याच विरोधात अर्ज दाखल केला.
भाजप-शिवसेना महायुतीच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उमेदवारी अर्ज भरुन पक्षशिस्तीचा भंग केल्यामुळे प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या सूचनेनूसार वाकचौरे यांची बुधवारी भाजपमधून हकालपट्टी करण्यात आली.