पैशासाठी माजी राज्यमंत्र्यांच्या मुलीचा छळ

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

सोलापूर : तुझे वडील आमदार होते, राज्यमंत्री होते, साधी कार सुध्दा दिली नाही, म्हणून माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांची मुलगी पूजा कांबळे यांचा पैशासाठी मानसिक आणि शारीरिक छळ करण्यात आला आहे. याप्रकरणी नांदेड येथील पती, सासू – सासऱ्यावर सदर बझार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पूजा कांबळे (वय २३, रा. शिक्षक सोसायटी, दक्षिण सदर बझार, मौलाली चौक) यांनी फिर्याद दिल्याने पती दिनेश कांबळे (वय २८), सासरे खंडेराव कांबळे (वय ६०) आणि सासू शारदा कांबळे (वय ५५, तिघेजण रा. खुशालसिंग नगर, हिंगोली नाका, नांदेड) या तिघावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सोने आणि कार न दिल्याने माजी राज्यमंत्री उत्तमप्रकाश खंदारे यांच्या मुलीचा छळ केल्याप्रकरणी पती, सासू – सासऱ्यावर सदर बझार पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. १७ मार्च २०१५ रोजी पूजा हिचा विवाह दिनेश याच्यासोबत झाला. लग्नानंतर पंधरा दिवस सासरकडील लोकांनी पूजाला व्यवस्थित नांदविले.

त्यानंतर पतीसह सासू – सासरा यांनी ‘तुझे वडील राज्यमंत्री होते. तीन टर्म आमदार होते. आम्हाला साधी कार सुद्धा दिली नाही’ असे म्हणून पूजा हिचा मानसिक छळ केला.

या कारणावरून तिला टोचून बोलून उपाशी ठेवले. माहेरी फोन लावू दिले नाही. माहेरून सोने व कार याची मागणी करून जून २०१९ पर्यंत शारीरिक व मानसिक त्रास दिला तसेच शिवीगाळ करीत मारहाण केल्याची तक्रार पूजा कांबळे यांनी सदर बझार पोलीस ठाण्यामध्ये दिली आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24