विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून मारहाण,आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,9 ऑगस्ट 2020 :-प्रेम प्रकरणातून विवाहितेला मोबाइलवर मेसेज पाठवल्यावरून युवकास मारहाण करून आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या चौघांवर आश्वी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

योगेश शंकर सारबंदे (२५, उंबरी-बाळापूर, ता. संगमनेर) असे मृत युवकाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी उंबरी-बाळापूर येथे घडली. योगश सारबंदे गावातीलच एका मुलीवर प्रेम करत होता.

मात्र तिचे लग्न कुटुंबीयांनी करून दिले होते. परंतु या दोघांमध्ये मोबाईलद्वारे संपर्क होता. तर एकमेकांना ते मेसेजही पाठवत. याची माहिती मुलीच्या कुटुंबाला समजली.

यामुळे योगेशला मारहाणही करण्यात आली. अल्पवयीन असताना मुलीचे लग्न झाल्याने तो पोलिसात जाऊ नये म्हणून त्याला अनेकवेळा धमकावण्यात आले.

या धास्तीने शुक्रवारी योगेशने चुलते राजेंद्र देवराम सारबंदे यांच्या शेतात विषारी औषध सेवन केले. तो बेशुद्ध अवस्थेत असल्याने त्याला लोणीच्या प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र तो मृत झाला होता.

या घटनेची फिर्याद योगेशचा भाऊ नितीन शंकर सारबंदे याने आश्वी पोलिसात दिल्यावरून अनिल भाऊसाहेब खेमनर, बबलू भाऊसाहेब खेमनर,

भगीरथ बाळासाहेब भुसाळ, बाळासाहेब जऱ्हाड (उंबरी-बाळापूर) या चौघांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24