शिक्षकाच्या पत्नीसह चार वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम,5 सप्टेंबर 2020 :-  राहुरी तालुक्यात शिक्षकाच्या पत्नीसह चार वृध्दांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. दरम्यान, तालुक्यात आणखी १९ जण बाधित झाले. एकूण ५२८ नागरिकांना कोरोनाची लागण झाली होती.

३८० रुग्णांनी कोरोनावर मात केली असून सध्या १२९ जण लढत देत आहेत. देसवंडी येथील शिक्षकाच्या पत्नीचा (वय ४७) नगर येथीस खासगी रुग्णालयात मृत्यू झाला. लाख येथे दोन वृध्द, तसेच तांभेरे व वाबोरी येथे प्रत्येकी एक वृध्द कोरोनामुळे मरण पावला.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24