जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 20 डिसेंबर 2020 :- नगर शहर व जिल्ह्यात कोरोनामुळे आणखी चार जणांचा मृत्यू झाला, तर नवे १५१ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. जिल्ह्यात १७५ रुग्णांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.

आता बरे झालेल्या रुग्णांची एकूण संख्या ६५ हजार १४९ इतकी झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे जिल्ह्यातील प्रमाण हे आता ९६.६७ टक्के इतके झाले आहे.

शुक्रवार सायंकाळी सहा वाजेपासून शनिवार सायंकाळी सहा वाजेपर्यंत रुग्ण संख्येत १५१ ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरू असणाऱ्या रुग्णांची संख्या आता १२२७ इतकी झाली आहे.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये ६, खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत ५३ आणि अँटीजेन चाचणीत ९२ रुग्ण बाधित आढळले.

जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा ३, नगर ग्रामीण १, पाथर्डी १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

खासगी प्रयोगशाळेत केलेल्या तपासणीत बाधित आढळून आलेल्या रुग्णांमध्ये मनपा १७, अकोले २, जामखेड १, कर्जत २, कोपरगाव ३, नगर ग्रामीण ३, नेवासे २, पाथर्डी १, राहाता ३, राहुरी १, संगमनेर १२, शेवगाव २, श्रीगोंदे १, श्रीरामपूर १, इतर जिल्हा १ आणि इतर राज्य १ अशा रुग्णांचा समावेश आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24