अहमदनगर लाईव्ह 24 टीम / कोपरगाव: धुळे येथून नगरकडे येणाऱ्या क्रेटा कारमधून ३ गावठी कट्टे, २६ जिवंत काडतुसे व चार मॅगेझिन जप्त करण्यात आले. नगर जिल्ह्यातील दोन सराईत गुन्हेगारही बुधवारी जेरबंद करण्यात आले.
गुन्हे शाखेचे पथक गस्त घालत असताना नगर जिल्ह्यातील काही सराईत गुन्हेगार धुळ्याकडून येणार असल्याची खबर मिळाली. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विंचुर चौफुली परिसरात सापळा रचला.
पांढऱ्या रंगाची क्रेटा (एम.एच.१६,बी.एच.८३८०) कारची तपासणी करताना दिनेश ज्ञानदेव आळकुटे, (वय ३०, पाईपलाईन रोड, सावेडी) व सागर मुरलीधर जाधव (वय २१, ब्राह्मणी, ता. राहुरी) यांच्याकडे तीन गावठी कट्टे,२६ जिवंत काडतुसे व चार मॅगझिनसह १० लाख ८७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
आळकुटेवर तोफखाना पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे.