ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : जिल्ह्यातील ‘त्या’ सोसायटीच्या सचिवाकडून चौदा लाखांचा अपहार

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar breaking : श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी कोठार येथील बेलवंडी कोठार सहकारी सेवा संस्थेच्या तत्कालीन सचिवाने रोख रकमेचा संस्थेच्या बँक खात्यात भरणा न करता १३ लाख ६९ हजार ९६१ रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सचिवाच्याविरोधात श्रीगोंदा पोलिस ठाण्यात अप्पर उपलेखापरिक्षक महेंद्र तुळशीराम घोडके यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मारुती अंकुश शेळके, असे गुन्हा दाखल झालेल्या सचिवाचे नाव आहे. याबाबत पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीनुसारः जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, अहमदनगर यांनी बेलवंडी कोठार सेवा सहकारी संस्थेचे दि. १ जुलै २००९ ते दि. ३१ मार्च २०१९ अखेर अ. क्र. १ ते ८ मुद्यांचे फेरलेखापरीक्षण करण्याचे आदेश पारित केले होते.

त्यानुसार सहाय्यक निबंधक, सहकारी संस्था, श्रीगोंदा यांनी फेरलेखापरीक्षण पूर्ण करून संदर्भ क्र. ३ नुसार विनिर्दोष्ठीत अहवाल सादर केला आहे. फेरलेखापरीक्षण आदेशातील अ. क्र. १ ते ८ मुदयांमधील क्रमांक २ हातावरील रोख शिल्लक व सचिव येणी,

या सर्व मुद्यांची तपासणी केली असता, प्रमाणित लेखापरीक्षक अविनाश कर्डिले यांनी वैधानिक लेखापरीक्षण अहवाल सन २०१८-१९ यामध्ये एकूण ९८ सभासदांच्या २५ लाख ८५ हजार १२७ एवढया रकमेच्या जमा पावत्या सचिव यांनी केल्या असून, हातावरील शिल्लक रकमेचा अपहार केल्याचे अहवालामध्ये नमूद केले होते.

फेरलेखापरीक्षण कालावधीत संस्थेने सन २००९-१० या कालावधीत हिशेबी दप्तराचे संगणकीकरण केल्यामुळे हस्तलिखित दप्तरातील रकमांची माहिती भरताना संगणकीकृत दप्तरामध्ये चुकीच्या रकमांची माहिती भरली होती.

हस्तलिखित व संगणकीकरण रकमांच्या माहितीची तुलनात्मक मांडणी करून फरकांच्या रकमा अपहारात दर्शविण्यात आल्या. सचिव मारुती अंकुश शेळके यांनी बेलवंडी कोठार संस्थेच्या सचिव पदाचा दि. १ फेब्रुवारी २०१२ रोजी पदभार घेतला असताना पुर्वीच्या रकमांना जबाबदार धरण्यात आले आहे.

संगणक वा हस्तलिखित दप्तराच्या फरकाची रक्कम, सबळ पुराव्याची रक्कम, तसेच बँक जमा पावत्या, सचिव अनामत १४ लाख ४४ हजार ६१० रुपयांची सबळ पुराव्यांची रक्कम २८ लाख १४ हजार ३०१ मधून कमी करण्यात आल्याने

उर्वरित १३ लाख ६९ हजार ६९१ रुपयांच्या रक्कमेचा अपहार केल्याप्रकरणी तत्कालीन सचिव मारुती अंकुश शेळके यांच्याविरुद्ध दाखल फिर्यादीनुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Ahmednagarlive24 Office