अहमदनगर Live24 टीम, 13 जानेवारी 2021 :- शहरातील विविध भागात पॅचिंगसह डांबरीकरणाची कामे सुरू आहेत. कामे सुरू असताना तसेच काम होताच काही व्यावसायिक व नागरिक रस्त्यावर पाणी सोडतात.
त्यामुळे रस्त्यांचे नुकसान होते, असा दावा करत मनपाने थेट फाैजदारी दाखल करण्याचा इशारा दिला आहे.
रस्ते दुरुस्तीसह पॅचिंग करताना खडी व डांबर टाकल्यानंतर रोलिंग केले जाते. परंतु, काही तासांतच व्यावसायिक, तसेच निवासी नागरिक त्यावर पाणी सोडतात. पाणी व डांबराचे तांत्रिकदृष्ट्या वितुष्ट असल्याने, काही तासात झालेल्या कामावर पाणी पडल्यास रस्त्यांचे नुकसान होते.
गुलमोहर रस्ता, शहर गावठाण या भागातील नागरिकांना यापूर्वीच नोटीस देण्यात आली आहे, जर पुढील कालावधीत रस्त्यावर पाणी सोडले, तर झालेल्या नुकसानीपोटीचा दंड केला जाईल. त्यानंतरही सुधारणा झाली नाही, तर फाैजदारी गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा महानगर पालिकेने दिला आहे.