अहमदनगर Live24 टीम,17 ऑक्टोबर 2020 :- अकोले तालुक्यात शेतजमीन वाटपावरून दोन गटांत वाद झाले. एका गटातील व्यक्तीने तिघांवर कोयत्याने वार केल्याची घटना बुधवारी विरगाव येथे घडली.
एका व्यक्तीच्या हाताची दोन बोटे तुटली. याप्रकरणी बाळासाहेब वाकचौरे यांनी फिर्याद दिली आहे. या घटनेत बाळासाहेब वाकचौरे, अलका वाकचौरे व किरण वाकचौरे गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
किरण व अलका वाद सोडवायला आले असता त्यांनाही महेशने कोयत्याने मारहाण केली. अलका यांच्या डाव्या हातावर कोयता मारल्याने तळहात कापला गेला.
अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved