फरार बाळ बोठे पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी; ‘ह्या’ वकिलांमार्फत केला अटकपूर्व जामिनासाठी अर्ज !

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 07 डिसेंबर 2020 :-रेखा जरे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी पत्रकार बाळ बोठे यांच्या मागावर पोलीस पथके आहेत. दरम्यान, त्याने नाशिक येथून पोलिसांना गुंगारा दिल्याची माहितीही समोर आली आहे.

काल तपास पथकाला गोपनीय सूत्रांकडून माहिती मिळाली की, बोठे नाशिकमधील एका हॉटेलमध्ये थांबला आहे. माहिती मिळाल्यावर तपास पथक तातडीने नाशिकला रवाना झाले. ज्या हॉटेलमध्ये तो थांबला आहे, तेथे जाऊन कसून तपासणी करण्यात आली.

तो तेथे थांबला असल्याच्या माहितीची खात्री झाली असली तरी, पोलीस पोहोचेपर्यंत तो पसार झाल्याचे सांगण्यात आले. आता हॉटेलमध्ये अधिक चौकशी सुरू असून, त्या आधारे शोध सुरू आहे. यापूर्वी काही ठिकाणांहून अशा अफवा पसरल्या होत्या. मात्र, नाशिकमधील माहिती खात्रीशीर होती, असे पोलिस सूत्रांचे म्हणणे आहे.

तरीही तो पोलिसांना गुंगारा देण्यात यशस्वी झाल्याचे दिसून येते. दरम्यान रेखा जरे हत्या प्रकरणातील मुख्य सूत्रधार, ज्येष्ठ पत्रकार बाळ बोठे याने अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात आज अर्ज दाखल केला असून यावर मंगळवारी सुनावणी होणार आहे.

रेखा जरे हत्याकांड प्रकरणात अटक केलेल्या आरोपींनी या खुनाचा मुख्य सूत्रधार बोठेच असल्याचे आपल्या जबाबात सांगितले आहे. या प्रकरणात आपण गुंतणार असल्याचे बोठेच्या लक्षात येताच तेंव्हापासून तो फरार झाला होता.

रेखा जरे हत्या प्रकरणात फरार असलेल्या बोठे याच्यावतीने वकील महेश तवले यांनी न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. यावर मंगळवारी सुनावणी होणार असून न्यायालय काय निकाल देणार ? हे उद्याच समजणार आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24