फरार बोठेचा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 08 डिसेंबर 2020 :-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्या तथा यशस्विनी महिला ब्रिगेडच्या अध्यक्षा असलेल्या रेखा जरे यांच्या खून प्रकरणात मुख्य सूत्रधार बाळ बोठे हाच असल्याचे निष्पन्न झाले.

त्यानंतर पोलिस बोठे याला पकडायला त्याच्या घरी गेले होते. परंतु पोलिसांच्या हातावर तुरी देत बाळ फरार झाला आहे. पोलिसांना गुंगारा देणाऱ्या बाळाला पकडण्यासाठी पाच तपास पथके रवाना केली आहेत.

दरम्यान, बाळ बोठे याच्या वतीने सोमवारी दुपारी नगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल करण्यात आला आहे. या अर्जावर मंगळवारी सुनावणी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या सुनावणीकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले आहे.

अहमदनगर Live24 च्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24