अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- कोपरगाव : कोपरगाव विधानसभा मतदारसंघातील विकास कामांचा अनुशेष भरून काढण्यासाठी भरीव निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडे केली आहे.
मंत्री मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात काल जिल्हा नियोजन समितीची बैठक झाली. यात आमदार काळे यांनी ही मागणी केली.
यावेळी जलसंधारणमंत्री शंकरराव गडाख, नगरविकास राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्रीताई घुले, जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य उपस्थित होते.
आ. काळे यांनी बैठकीत सांगितले की, कोपरगाव तालुक्याच्या दुष्काळी गावातील रांजणगाव देशमुखसह, अंजनापूर, बहादराबाद, धोंडेवाडी, सोयेगाव, वेस, मनेगाव अशा सात गावांतील नागरिकांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रांजणगाव देशमुख पाणीपुरवठा योजनेवर अवलंबून आहे. या ग्रामपंचायती आर्थिकदृष्ट्या सक्षम नसल्यामुळे वीजबिलाची थकबाकी वाढत जाऊन योजना बंद पडते.
या गावांतील नागरिकांचा पाणीप्रश्न कायमचा मिटावा, यासाठी रांजणगाव देशमुख पाणीपुरवठा योजनेसाठी सोलर प्लँट द्यावा, या योजनेच्या साठवण तलावाचे दुरुस्तीसाठी निधी द्यावा, तालुक्यातील ३६ नळ पाणीपुरवठा योजनांसाठी स्वतंत्र रोहित्र उपलब्ध करून द्यावे, नगर-मनमाड महामार्गावरील खड्डे बुजविण्यात यावे, या मागण्या आ. काळे यांनी यावेळी केल्या.
श्रीक्षेत्र मयुरेश्वर देवस्थानला ‘क’ वर्ग दर्जा देण्यात आला असल्याची माहिती आ. काळे यांनी दिली आहे. माजी आ. अशोकराव काळे यांच्या कार्यकाळात कोपरगाव शहरात बांधलेल्या औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या दुरुस्तीसाठी निधी द्यावा, ग्रामीण भागातील रस्ते दुरुस्तीसाठी शाळा खोल्यांच्या दुरुस्तीसाठी भरघोस निधी मिळावा, अशाही मागण्या आ. काळे यांनी केल्या.
Web Title -funds should be provided to supplement the backlog of development works in Kopargaon