गणराया, कोरोनाचे संकट दूर करून जनजीवन गतिमान कर!: बाळासाहेब थोरात

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 22 ऑगस्ट 2020 :-  काँग्रेस प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांनी आज संगमनेर येथील सुदर्शन निवासस्थानी विधिवत पूजा करून श्री. गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली.

यावेळी सौ. कांचनताई थोरात व डॉ. जयश्रीताई थोरात उपस्थित होत्या. जगावर आलेले कोरोनाचे संकट लवकर दूर होऊ दे आणि पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे, अशी प्रार्थना थोरात यांनी गणरायाच्या चरणी केली आहे.

गणेशत्सवावर कोरोनाचे सावट असल्याने सर्वत्र हा उत्सव साधेपणाने पण भक्तिभावाने साजरा केला जात आहे. सार्वजनिक उत्सवाबरोबरच घरा-घरात गणशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे.

यावर्षी दरवर्षीचा जल्लोष नसला तरी तोच उत्साह व भक्तीभाव असून लाडक्या गणराचे आगमन झालेले आहे. जनतेने कामाशिवाय घराबाहेर पडू नये, दक्षता घ्यावी, मास्क न विसरता वापरा, घरीच रहा आणि सुरक्षित रहा.

विघ्नहर्ता जगावरचे संकट दूर करो हीच गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना करत बाळासाहेब थोरात यांनी सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत.

आमच्या इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा: wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com | ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर | इंस्टाग्राम | टेलिग्राम । © Copyright 2020, All Rights Reserved

अहमदनगर लाईव्ह 24