अहमदनगर Live24 टीम,15 जुलै 2020 :- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक धार्मिक सण-उत्सव अत्यंत सध्या पद्धतीने साजरे होत आहेत. अनेक धार्मिक कार्यक्रमांना पूर्णतः बंदीही घातली आहे.
आता 173 वर्षांची परंपरा असणाऱ्या सद्गुरू गंगागिरी महाराज यांच्या हरिनाम सप्ताहाकडे भाविकांचे लक्ष लागले होते. आता यावरही निर्णय घेण्यात आला आहे.
हा सप्ताह सराला बेटावरच करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा एकादशीला (उद्या 16 जुलै) पुणतांबा येथे महंत रामगिरी महाराज करणार आहेत.
परंतु, हरिनाम सप्ताहासाठी उपस्थित राहण्याची कोणत्याही भाविकास परवानगी राहणार नाही. त्यामुळे वाहिन्यांवर अथवा वृत्तपत्रांतून या सप्ताहाचा आनंद भाविकांना घ्यावा लागणार आहे.
सराला बेटाकडे येणारे सर्वच रस्ते सप्ताह काळात बंद करण्यात येणार आहेत. या सप्ताहासंदर्भात नियोजन बैठक सराला बेट येथे रामगिरी महाराज यांच्या उपस्थितीत झाली.
रामगिरी महाराज यांनी सांगितले की आपल्यावर कोरोनाचे मोठ्या प्रमाणावर संकट आले असून यामध्ये शासनाने योग्य पद्धतीने पावले उचलली आहेत.
शासकीय आदेशाचे पालन करून सप्ताहाची परंपरा फक्त पन्नास भाविकांच्या उपस्थितीत सराला बेटांवर पार पडेल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com
जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews