अहमदनगर :- पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे. नगरसह महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांमध्ये अशी परवानगी देण्यात आली आहे.
पेट्रोलियम व नैसर्गिक गॅस मंत्रालयाअंतर्गत कार्यरत पेट्रोलियम आणि नैसर्गिक गॅस नियामक मंडळाने महाराष्ट्रातील 19 जिल्ह्यांसह देशातील एकूण 406 जिल्ह्यांमध्ये भौगोलिक क्षेत्रांना परवानगी दिली आहे.
महाराष्ट्रातील पालघर, ठाणे, रायगड, पुणे, रत्नागिरी, सोलापूर, कोल्हापूर, मुंबई, बृह्नमुंबई, पुणे शहरासह पिंपरी चिंचवड आणि लगतचे हिंजवडी, चाकण, तळेगाव क्षेत्र, अहमदनगर, औरंगाबाद, लातूर , उस्मानाबाद, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, धुळे आणि नाशिक या जिल्ह्यांमध्ये पाईपद्वारे नैसर्गिक गॅस पुरवठा करण्यासाठी भौगोलिक क्षेत्रांना परवानगी देण्यात आली आहे.