ब्रेकिंग

अहमदनगर ब्रेकिंग : मुलीची गळफास घेवून आत्महत्या

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmadnagar Breaking : एका सोळा वर्षीय शाळकरी मुलीने राहत्या घरात फॅनच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी (दि.२८) रात्री ११.३० च्या सुमारास नगर तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली.

या मुलीचे कुटुंबीय मंगळवारी रात्री झोपल्यानंतर तिने रात्री ११.३० च्या सुमारास घरातील छ्ताला असलेल्या फॅनच्या हुकला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला.

ही बाब तिच्या वडिलांच्या निदर्शनास येताच त्यांनी तिला उपचारासाठी नगर मधील जिल्हा शासकीय रुग्णालयात आणले.

मात्र तेथील डॉक्टरांनी तिला उपचारापूर्वीच मृत घोषित केले. याबाबतची खबर एमआयडीसी पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी याप्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलिस अंमलदार शाबीर शेख हे करीत आहेत.

दरम्यान मुलीने आत्महत्या का केली याचे कारण अद्याप समोर आलेले नाही. तिच्या कुटुंबियांचे जबाब घेतल्यानंतर कारण स्पष्ट होईल असे पोलिसांनी सांगितले.

Ahmednagarlive24 Office