अहमदनगर Live24 : जीवघेण्या कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाला की नाही याचे निदान अवघ्या १५ मिनिटात करणाऱ्या ‘टेस्ट किट’ची निर्मिती अकोले तालुक्यातील एका मुलीने बनविली आहे.
अकोले तालुक्यातील पिंपळदरी येथील संशोधक शितल रंधे-महाळुंकर हिचे मोठे योगदान आहे. विशेष म्हणजे या किटला पुणे येथील राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांच्याकडूनही मान्यता मिळाली आहे.
शितल रंधे यांचे अकोले तालुक्यातील पिंपळदरी हे माहेर आहे. त्यांचे शिक्षण एम.एस्सी. बायोटेक झाले असून, त्या कुसगाव (पुणे) येथील ‘इम्नो’ सायन्स या कंपनीत रिसर्च अॅन्ड डेव्हलपमेंट विभागात प्रमुख आहेत.
कंपनीतील शितल रंधे-महाळुंकर यांच्या नेतृत्वाखाली अतुल तरडे , अविनाश तुळसकर, अमृत कोरे, वर्षा गुंजाळ, अवधुत सातपुते, ललित बारावकर, हनुमंत गोयकर यांनी संशोधनाच्या कामास सुरुवात केली.
शीतल आणि तिच्या टीमने मेहनत घेवून अल्पावधीत टेस्ट किट विकसीत केली, किट पुण्यातील आयसीएमआर/ एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठविल्या.
दोन दिवसात एनआयव्ही पुणे कडून मान्यता मिळाली. सेंट्रल ड्रग स्टॅन्डर्ड कन्ट्रोल ऑरगनायझेशन (सीडीएससीओ) कडून तपासणी अहवाल आल्यानंतर कोरोनो विषाणू चाचणी किट उत्पादनाची परवानगी मिळाली आहे.
शितल अकोले शहरातील कन्या शाळेत दहावीपर्यंत तर बारावीपर्यंत अकोले महाविद्यालयात होती. पुणे विद्यापिठातून तिने बायोटेक मध्ये पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे.
शीतल ने बनवलेल हे किट लवकरच बाजारात उपलब्ध होणार आहे.अवघ्या पंधरा मिनिटात यामुळे कोरोनाची चाचणी होणार असून याचा नक्कीच राज्यातील जनतेस फायदा होईल.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®