अहमदनगर लाईव्ह 24 टीम :- श्रीगोंदे तालुक्यातील वडाळी येथील इयत्ता दहावीत शिकणाऱ्या मुलीने २२ फेब्रुवारी रोजी रात्री साडेदहाच्या दरम्यान शेतातील आंब्याच्या झाडाला अंगातील गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.
नगिना हारुण सय्यद असे मृत मुलीचे नाव आहे. श्रीगोंदे तालुक्यातील वडाळी येथील हारुण सय्यद यांची इय्यता दहावीच्या वर्गात शिकत असलेली मुलगी नगिना हिने आत्महत्या केली आहे.
२२ फेब्रुवारी रोजी घरात सर्व जेवण करण्यासाठी बसले असता नगिना तेथे नव्हती. घरातील सर्वांनी तिला शेजारच्यांकडे पाहिले. मात्र, ती तेथे आढळली नाही. त्यामुळे घरातल्यांनी आसपास पाहण्यास सुरवात केली.
त्यांच्या शेतातील आंब्याच्या झाडाला तिने जर्किनच्या सहाय्याने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आली. घरच्यांनी घटनेची श्रीगोंदे पोलिस स्टेशनमध्ये माहिती देत मृतदेहास खाली उतरून घेतले. श्रीगोंदे पोलिसात अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.
अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com वर
This Story First Publish on Ahmednagarlive24.com®
No1 News Network Of Ahmednagar™
जगभरातील लाखो वाचक असलेले अहमदनगर जिल्ह्यातील सर्वाधिक लोकप्रिय व विश्वासार्ह न्यूज पोर्टल www.wordpress-1209733-4285786.cloudwaysapps.com