खुशखबर ! बाबा रामदेव यांनी केले कोरोनावर औषध तयार ; नाव दिले कोरोनिल,वाचा सविस्तर …

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम ,23 जून 2020 :  कोरोनाने जगभर थैमान घातले आहे. यामुळे अनेक देशांच्या आर्थिक घड्या विस्कटल्या आहेत. यावर लस शोधण्याचे काम संबंध जगभरात सुरु आहे.

परंतु या दरम्यान बाबा रामदेव यांची संस्था पतंजलीने यावर आयुर्वेदिक औषध तयार केले आहे. आज मंगळवारी हे आयुर्वेदिक औषधं ‘कोरोनिल’ जगासमोर आणणार आहे.

आचार्य बालकृष्ण हे आज दुपारी 12 वाजता हरिद्वारच्या पतंजली योगपीठात कोरोनाचं आयुर्वेदिक औषध ‘कोरोनिल’ लॉन्च करणार आहेत.

पतंजली योगपीठाने दावा केला होता की, त्यांना कोविड – 19 ला रोखण्याचे औषध सापडले आहे आणि ते प्रभावीदेखील ठरले आहे. . भारतात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे.

अनलॉक सुरू झाल्यामुळे कोरोना संसर्गाचे प्रमाण वाढत आहे. जर पतंजली योगपीठाचा दावा खरा ठरला तर देशातील लाखो लोकांना मोठी मदत मिळणार आहे.

अहमदनगर Live24 वर तुमच्या बातम्या / माहिती तसेच जाहिरातीसाठी संपर्क करा ahmednagarlive24@gmail.com

जॉईन व्हा आमच्या फेसबुक ग्रुपमध्ये
https://www.facebook.com/groups/Ahmednagarlivenews

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24