अहमदनगर Live24 टीम, 15 डिसेंबर 2020 :- गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात कांद्याचे दर चांगलेच कोसळले होते. कांद्याच्या दरात सातत्याने होणारी घसरण पाहून बळीराजा चिंताग्रस्त झाला होता.
मात्र आता शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक माहिती समोर येत आहे. नेवासा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव कांदा मार्केटमध्ये शनिवारच्या तुलनेत कांद्याच्या आवकेत साडेबारा हजार गोण्यांनी वाढ झाली.
लाल कांद्याला जास्तीत जास्त 4 हजारापर्यंत तर गावरान कांद्याला 3500 रुपयांपर्यंत भाव मिळाला. तसेच एक नंबर कांद्याला 3000 ते 3500 रुपये,
दोन नंबरला 2500 ते 2800 रुपये, गोल्टी कांद्याला 2500 ते 2700 रुपये तर तीन नंबरच्या कांद्याला 500 ते 1000 रुपये भाव मिळाला.
↵काल कांद्याची एकूण आवक 55 हजार 508 गोण्या इतकी झाली. यामध्ये लाल कांद्याची 42 हजार 548 गोण्या आवक झाली. तर गावरान कांद्याची 12 हजार 960 गोण्या आवक झाली.